अमेरिकन अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणवर आतापर्यंतची सर्वात कठोर आर्थिक कारवाई जाहीर केली आहे.इराणने कराराची संधी गमावली आहे, त्यामुळे आता त्याला आर्थिकदृष्ट्या एकटे पाडले जाईल, असा इशारा त्यांनी दिलाय.इतकंच नाही तर इराणशी कोणताही व्यापार किंवा आर्थिक व्यवहार करणाऱ्या देशांवर अमेरिकेत येणाऱ्या आयातीवर २५ टक्के अतिरिक्सत टॅरिफ लावण्याचीही घोषणा ट्रम्प यांनी केलीय. इतकंच नाही तर इराणला मदत करणाऱ्या संस्थांवरही कारवाई केली जाईल. यात बँका, कंपन्या, विमानतळे आणि सरकारी संस्था यांचा समावेश आहे.