अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी रविवारी पालघरच्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट दिली, यावेळी गौतम अदाणी यांच्यासह अदाणी एनर्जी, अदाणी ग्रीन आणि एनर्जी स्ट्रॅटेर्जी या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते, यावेळी त्यांनी प्रकल्पातील अधिकाऱ्यांकडून संबंधित तंत्रज्ञान आणि अन्य बाबींची माहिती घेतली, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अणुऊर्जा उत्पादनाला चालना देण्यासाठी भरघोस तरतूद केलीय, तसेच खासगी उद्योगांमार्फत अणुऊर्जा उत्पादन करण्यासाठीही आता मुभा दिलीय, या पार्श्वभूमीवर गौतम अदाणी यांच्या या भेटीला महत्व आलंय..