नितेश राणे यांना कितीही समज दिली तरी त्यांची मुस्लिमांविरोधातली टोकाची वक्तव्यं काही थांबत नाहीत.मुस्लिमांविरोधात आक्रमक असलेल्या नितेश राणेंना भाजपनं पोस्टरबॉय केलं.मात्र आता नितेश राणे मुस्लिमांविरोधात काहीच्या काही बरळायला लागलेत.शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते, हा नितेश राणेंचा नवा शोध नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यांचे कान टोचलेत.तर नितेश राणेंचे इतिहासाचे शिक्षक कोण, असा प्रश्न अनेक नेत्यांना पडलाय.शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते, या त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे आणि याबद्दल इतिहास काय सांगतो, पाहुया स्पेशल रिपोर्ट....