राजकीय नेते आणि त्यातही मंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तींनी काय बोलावं हे आपण ठरवू शकत नाही.कारण तो मंत्रीमहोदयांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे.पण आपण जे काही बोलतो त्याने नेमके काय परिणाम होतील याचा विचार नेत्यांनी बोलण्यापूर्वी करावा इतकी तरी अपेक्षा तरी आपण ठेवू शकतो ना पण आता तुम्ही तीही अपेक्षा ठेवू नका कारण आपल्या नेत्यांना काहीही बोल पण वाद पेटव असा जणू छंद जडलाय आणि यात आघाडीवर आहेत भाजपचे मंत्री नितेश राणे खरं तर बंदरे आणि मस्त्यव्यवसाय हे राणेंचं खातं पण या खात्यात काय चालतं याकडे लक्ष देण्यापेक्षा हे मंत्रीमहोदय मटणाविक्रीपासून ते महाराजांच्या इतिहासापर्यंत सगळ्या मुद्द्यांवर मतं मांडतात आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असते हिंदुत्ववादी भुमिका.पण ही भुमिका कधीकधी इतक्या टोकाला जाते की मुस्लीम समाज राहतो बाजूला आणि हिंदू धर्मीयांमध्येच वाद पेटतात.मटणविक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देण्याबाबत नितेश राणेंनी जी भुमिका मांडली त्यामुळे आता मार्तंड देवस्थान समितीमध्येच वाद निर्माण झालाय..