महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरमध्ये वातावरण तापत चाललं आहे. परदेशी यांना श्रद्धांजली म्हणून शहर बंदचे आवाहन करण्यात आलं होतं. मात्र काही ठिकाणी दुकाने बंद करण्यास विरोध झाल्याचा आरोप करत त्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनात आमदार अक्षय कर्डिलेही सहभागी होणार आहेत.