Yogesh Kadam यांच्या भाषणादरम्यान DJ चा व्यत्यय; आवाज वाढवला तरी फरक पडत नाही, योगेश कदम संतापले

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या भाषणादरम्यानच डीजेच्या आवाजावरून वाद निर्माण झाला.कदम यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांचा डीजे सभास्थळासमोरून जात असल्याची घटना घडली.अचानक डीजेचा आवाज वाढल्याने योगेश कदम यांनी व्यासपीठावरूनच नाराजी व्यक्त केली.आवाज दाबण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, मात्र एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज कोणी दाबू शकत नाही, असे वक्तव्य करत त्यांनी या मुद्द्याला राजकीय रंग दिला. त्यामुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित व्हिडीओ