Amboli धबधब्यावर साप चावल्याने पर्यटकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराला वेळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाधर मरप्पा असं मृत पर्यटकाचं नाव असून ते हम्पीहून मित्रांसोबत आंबोलीत आले होते.सापदंशानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत होतं, मात्र धबधबा परिसरातील मोठ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग मिळाला नाही. त्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ