शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असताना पवित्र पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो उमेदवारांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोर्टलवर ओटीपी मिळत नसल्याच्या, अकाउंट ओपन होत नसल्याच्या आणि प्राधान्यक्रम डाउनलोड न होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. हेल्पलाईनवर वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.. 11 ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ आल्याने हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण आहे... NDTV मराठीच्या बातमीनंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने महाराष्ट्र शिक्षण विभागाकडे मागणी केलीय.पवित्र पोर्टल शिक्षक भरतीतील पसंतीक्रम प्रक्रियेला तात्काळ मुदतवाढ द्या अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने केली..