Rain Alert| राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कसा असेल? कोणत्या 13 जिल्ह्यांना Yellow Alert?

महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 9 ते 13 ऑगस्टदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता असून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित व्हिडीओ