जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, खोटे नगर ते कालंका माता चौक या अवघ्या 6 किलोमीटरच्या मार्गावर शेकडो खड्डे पडले आहेत. खोटे नगर बसस्टॉपजवळ 100 मीटरमध्ये तब्बल 25, तर गुजरात पेट्रोल पंप उड्डाणपुलावर 28 मोठे खड्डे आहेत. महामार्गावरील बायपास बंद असल्याने या मार्गावर वाहनांचा भार वाढला असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. खराब रस्त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी एका महिलेचा जीव गेल्यानंतरही दुरुस्तीला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.