छत्तीसगडला महाराष्ट्राशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930ची येरकड ते धानोरा दरम्यानची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सुमारे 15 किलोमीटरच्या या मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकींसह अवजड वाहनांचीही या मार्गावर मोठी कसरत होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्येचा घेतलाय आढावा आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी.