शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असताना पवित्र पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो उमेदवारांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोर्टलवर ओटीपी मिळत नसल्याच्या, अकाउंट ओपन होत नसल्याच्या आणि प्राधान्यक्रम डाउनलोड न होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत... यासंदर्भात NDTV मराठीने बातमी दाखवल्यानंतर शिक्षण विभागाने दखल घेत अर्जात पसंतीक्रम प्रक्रियेला 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.. NDTV मराठीच्या बातमीनंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशननेही शिक्षण विभागाकडे मुदतवाढीची मागणी केली होती..