Ajit Pawar | कार्यक्रमाला गेले आणि अजित पवारांनी घेतला भेळचा आणि पाणीपुरीचा आस्वाद | NDTV मराठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात आयोजित 'राष्ट्रवादी परिवार मिलन' कार्यक्रमात हजेरी लावली. राज्याच्या राजकारणात नेहमी व्यस्त असणाऱ्या अजित पवारांचा या कार्यक्रमात एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत बसून भेळ आणि पाणीपुरीसारख्या चाट पदार्थांवर ताव मारला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या या साधेपणाची आणि खवय्येगिरीची दृश्ये सध्या चर्चेचा विषय ठरली असून, त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधला

संबंधित व्हिडीओ