गाझा अखेर दोन वर्षांनंतर शांत होणार आहे... सततचे बाँबहल्ले, सततची मृत्यूची टांगती तलवार दूर होणार आहे. इस्रायलच्या कॅबिनेटनं शुक्रवारी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावावर तसंच कैद्यांच्या सुटकेला मंजुरी दिलीय.त्याचबरोबर आता हमाससह इस्रायलनं शस्त्रसंधी अधिकृतपणे लागू केलीय.यासह इस्रायलनं गाझामधील काही महत्त्वाच्या पॉईंटसवरून त्यांचं सैन्य माघारी घेत सुरक्षित ठिकाणी तैनात केलंय. आता करारानुसार लवकरत २० ओलिसांची सुटका आणि त्याबदल्यात पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका अशी देवाणघेवाण होऊ शकते त्यामुळे सामन्य पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिक उत्सुक आहेत. दोन वर्षांनतर युद्ध थांबणार असल्यानं एक समाधानही आहे आणि एक हुरहुरही... का ते पाहूया.