रोहित शर्माने सराव करताना नेहमीप्रमाणे मोठे फटके खेळत आपल्या चाहत्यांचं मनोरंजन केलं.. पण चौकार, षटकार लगावण्याच्या नादात रोहित शर्माने आपलंच नुकसान करुन घेतलं. रोहित शर्माने टोलावलेला एक चेंडू थेट त्याच्या आलिशान कारवर जाऊन कोसळला.. सुरुवातीला काही काळ शांतपणे फलंदाजी केल्यानंतर, रोहितने चाहत्यांना त्याची स्फोटक बाजू दाखवली आणि मोठे शॉट्स मारले.. त्याचे अनेक शॉट्स मैदानाबाहेर गेले. पण आता त्याने एक षटकार मारला ज्यामुळे त्याचंच नुकसान झालं.. रोहितने मिडविकेटच्या दिशेने एक उंच शॉट मारला आणि चेंडू थेट मैदानाबाहेर गेला.. हा चेंडू रोहित शर्माच्या बाहेर उभ्या असलेल्या कारवर पडला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.. या व्हायरल व्हिडिओमध्ये ही कार रोहितचीच असल्याचं ऐकू येतंय.. रोहितने आपल्या कारची विंडशिल्ड फोडली..