आपत्तींचा देश अशीच ओळख असलेल्या फिलीपाईन्सला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय. ३० सप्टेंबरलाच ६.९ इतक्या तीव्रतेच्या भूकंपानं सेबू प्रांत हादरला होता. आणि दहा दिवसांनंतर पुन्हा एकदा फिलीपाईन्समध्ये भीषन भूकंप झालाय यावेळी मिंडानाओ भागात ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपानं हाहाकार उडवून दिलाय. या भूकंपानंतर पुन्हा एकदा त्सुनामीचा इशारा देण्यात आला. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. या भूकंपामुळे नेमकी किती हानी झालीय. दहा दिवसांतच इथं पुन्हा भूकंप का झाला. फिलीपाईन्समध्येच वारंवार भूकंप का होतात पाहूया एक सविस्तर ग्लोबल रिपोर्ट.