बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत पराभवानंतर ठाकरे गटाकडून नवीन कार्यकारिणीचा मेळावा पार पडला.. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बेस्ट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय.. "निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही. पराभव हा कायमस्वरूपी नसतो. पुढच्या वेळेस आपण अधिक जोमाने, ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि विजय मिळवू, असं ठाकरेंनी म्हटलंय.. त्याचबरोबर ठाकरे ब्रँडची अजून सुरुवात झाली नाही, सुरुवात झाल्यावर तुमचा कसा बँड वाजतो बघा असा इशाराही विरोधकांना दिलाय..