Global Report | भारत अफगाणिस्तानच्या संबंधांमध्ये एक नवी घडामोड, पाहुयात याचसंदर्भातला Report

भारत अफगाणिस्तानच्या संबंधांमध्ये एक नवी घडामोड घडलीय. भारतानं अफगाणिस्तानात पुन्हा दूतावास सुरु करणार असल्याचं सांगितलंय.हा दूतावास २०२१ मध्ये बंद करण्यात आला होता कारण तालिबानचं अफगाणिस्तानात पुनरागमन. मात्र पाच वर्षांतर पुन्हा भारतीय दूतावास सुरु होणार आहे. तालिबानचे परराष्ट्र मंत्रीही पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेत. मात्र अद्याप भारतानं तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही.तरी काबुलमध्ये दूतावासाची घोषणा का. अफगाणिस्तान आणि भारतामध्ये हे संबंध नव्यानं प्रस्थापित होत असताना अफगाणिस्तान आणि त्याचा शेजारी पाकिस्तान यांच्यात नेमका संघर्ष का उफाळून आलाय. पाहूया एक सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ