बिहार विधानसभा निवडणूक सध्या चांगलीच गाजतेय... नितिश कुमार, तेजस्वी यादव, काँग्रेस आणि भाजपच्या लढाईत प्रशांत किशोरही चांगलेच चर्चेत आलेत. दुसरीकडे बिहारमध्ये सिंघम आणि सुपरकॉप म्हणून ओळखले जाणारे, आणि महाराष्ट्राचे जावई असलेले IPS अधिकारी शिवदीप लांडे निवडणुकीचा रिंगणात उतरलेत. दोन विधानसभा मतदारसंघातून लांडे आपलं नशीब आजमावत आहेत. महाराष्ट्राचा जावई बिहारच्या निवडणुकीत उतरल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचंही बिहार निवडणुकीकडे लक्ष लागलंय.