सांगोल्यात शेकाप मधील काही नेत्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी काही हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी मद्यधुंद अवस्थेत दारूच्या बाटल्या गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थान कडे फेकल्या. यानंतर देशमुख समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहे. आमदार बाबासाहेब देशमुख समर्थक यांच्याकडून गणपतरावांच्या घराकडे बाटल्या फेकल्याच्या निषेधार्ह उद्या सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे सांगोल्यात शेकापचा गड फुटत असताना घरावरील हल्ल्याच्या घटनेनं वेगळेच वळण लागले आहे.