गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामुळे योगेश कदमांचं मंत्रीपद धोक्यात आलंय. विरोधकांनी योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत. योगेश कदमांनी वरिष्ठ पदावरील व्यक्तीच्या सांगण्यावरून हे काम केल्याचा निर्वाळा रामदास कदमांनी दिलाय.. आणि योगेश कदमांनीही मंत्रिपद वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे धाव घेतली. मात्र शिंदेंमुळे योगेश कदमांना अभय मिळणार? की भाजपच्या त्या बड्या नेत्याला वाचवण्यासाठी योगेश कदमांचा राजकीय बळी जाणार? पाहुयात या खास रिपोर्टमधून..