महायुतीमध्ये एकीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता भाजपचे माजी आमदार वैभव पिचड काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.