ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे महिलेचा बळी गेलाय.मधुकर नगर येथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव यांचा दूदैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. छाया यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. रुग्णालयात नेत असताना मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला. त्यामुळे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय.