Chicken-Mutton वर बंदी, हिंदुत्ववादी अजेंडा? टोकदार प्रश्नांचा करेक्ट कार्यक्रम NDTV मराठी Speical

पंधरा ऑगस्ट..म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन..या दिवशी देशाला स्वातंत्र मिळालं, या स्वातंत्र्याच्या अधिन राहुन भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला काही मुलभूत अधिकार बहाल केलेत. त्यापैकी एक अधिकार म्हणजे धार्मिक आचरण करण्याचं स्वातंत्र्य.. पण या धार्मिक स्वातंत्र्याचा अवलंब करताना इतरांचे मुलभूत अधिकार पायदळी तुडवले जातात का? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. सध्याचा कबुतरखान्याचा वाद हा यापैकीच एक..आता यात आणखी एका वादाची भर पडलीय, आणि ती म्हणजे मांसाहार बंदीच्या निर्णयाची..त्याचं झालं असं की पंधरा ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका आणि त्यानंतर आता नागपूर महापालिकेने असा आदेश काढलाय की, या दिवशी महापालिका हद्दीत मांसाहाराला बंदी असेल, त्यामुळे कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकानंही बंद राहतील. पण या निर्णयाला आता विरोध होतोय. अगोदर जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेंनी याविरोधात सूर लावला होता. पण आता सर्वसामान्य़ांमधूनही निषेधाचा सूर उमटतोय..अशा निर्णयांमुळे आपल्या मुलभूत स्वातंत्र्याचा संकोच होतोय, असं या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचं मत आहे, तर सध्या श्रावण सुरूच आहे,त्यामुळे एखाद दिवस मांसाहार नाही केला तरी चालेल असं म्हणत या निर्णयाचं समर्थनही केलं जातंय.

संबंधित व्हिडीओ