कोकणात सध्या एक मोठा वाद रंगलाय.गुहागरमधला ब्राह्मण समाज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांविरोधात आक्रमक झालाय.भास्कर जाधवांनी ब्राह्मण समाजाबाबत एक वक्तव्य केलं.त्यानंतर गुहागरमधले ब्राह्मण चिडले.भास्कर जाधवांना ब्राह्मण समाजानं निषेध पत्रही लिहिलं.जाधवांनी माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.प्रकरण एवढं तापललेलं असताना भास्कर जाधवांनी काल मुंबईत एक मेळावा घेतला आणि म्हणाले ब्राह्मण समाज पाताळयंत्री आहे. स्वाभाविकपणे आता हा वाद आणखी चिघळलाय...