तुम्ही नॉनव्हेज अर्थात मांसाहारप्रेमी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीला तुमचा फ्रायडे स्पेशल बेत असेल तर कदाचित तुम्हाला नॉनव्हेज पदार्थ मिळू शकणार नाहीत... कारण काही महापालिकांनी १५ ऑगस्टला मांसविक्री करण्यावर बंदी घातलीय... मात्र स्वातंत्र्यदिनाचा आणि नॉनव्हेज न खाण्याचा काय संबंध असा प्रश्न आता विचारला जातोय.तर १५ ऑगस्टला तुम्ही मॅकडोनाल्ड आणि केएफसीसुद्धा बंद ठेवणार का, असा प्रश्न मनसेनं विचारलाय