उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधीच नाराज आहेत.शिंदेंच्या नाराजीची दहा कारणं आहेत.हे कमी होतं की काय. तर आता त्यामध्ये आणखी दोन कारणांची भर पडलीय.नाराज आणि अस्वस्थ शिंदेंच्या दिल्लीतल्या फेऱ्या वाढत असतानाच इकडे झेंडावंदन कुणी करायची याची यादी जाहीर झाली.त्यात भरत गोगावलेंना आणि दादा भुसेंना डावलून अदिती तटकरे आणि गिरीश महाजनांना झेंडावंदन करण्याचे आदेश देण्यात आले.शिंदे आता एवढे नाराज झालेत.की ते आज कॅबिनेट बैठकीलाही आले नाहीत. पाहुया शिंदेंच्या नाराजीची आधीची १० आणि आता भर पडलेली दोन कारणं....