जळगावच्या जामनेरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. जामनेरमध्ये २० वर्षांच्या एका तरुणाची दहा ते बारा तरुणांनी हत्या केली.ज्याची हत्या झाली तो तरुण पोलीस भरतीचा अर्ज भरायला जामनेरमध्ये आला होता.तो एका हॉटेलमध्ये बसलेला असताना त्याच्यावर दहा ते बारा तरुणांनी हल्ला केला.त्याला एवढं मारलं की त्याचा या मारहाणीत मृत्यू झाला.या घटनेला अनेक अँगल आहेत.प्रेमप्रकरण, धर्म आणि मॉब लिंचिंग.पाहुया जामनेरमध्ये सुलेमान पठाणसोबत नेमकं काय घडलं.