Chhatrapati Sambhajinagar | कुठे गेला खाकीचा धाक? पोलिसांसमोर गुंडाची धमकी, पोलीस मूग गिळून गप्प का?

संभाजीनगरमध्ये गावगुंडांचा हैदोस एवढा वाढलाय.की त्यांना खाकी वर्दीचा धाकच उरलेला नाही.एक गुंड नुकताच जामिनावर सुटला.रात्री मैत्रिणीच्या घरी गेला आणि मैत्रिणीला गोळी मारली. पोलिसांनी या गुंडाला पकडलं.पण या गुंडाचा माज आणि मुजोरी एवढी की पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्यानं थेट कॅमेऱ्यासमोर आणखी तीन-चार मुलींना गोळी मारण्याची धमकी दिली.गुंड माजोर्डे आणि उद्दाम असतातच.मात्र या सगळ्या प्रकरणात संशयास्पद होती ती पोलिसांची भूमिका.

संबंधित व्हिडीओ