घरकाम करण्याला नकार देणाऱ्या इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वस्तीगृहातील गृहपाल महिलेने ढकलून दिल्याने विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार घडलाय... धुळ्यातल्या जिजामाता मुलींच्या वस्तीगृहात हा प्रकार समोर आलाय.. या प्रकारानंतर समाज संबंधित गृहपाल महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उशिराने शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला....