रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजुनही शमलेला नाही. उलट तो वाढण्याची शक्यता आहे. कारण 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत. खरंतर रायगडसाठी शिवसेनेचे भरत गोगावले आणि नाशिकसाठी दादा भुसे हे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असतानाही पुन्हा एकदा ध्वजारोहणाची संधी नाकारल्याने शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी आहे. या नाराजीमुळे गोगावलेंनी आज मंत्रिमंडळाला दांडी मारल्याचीही चर्चा आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादावर शिंदेंच्या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. भरत गोगावले आणि दादा भुसे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. आज किंवा उद्या मान मिळेल,, सब्र का फल मिठा होता है असं गोगावले म्हणालेत. तर वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करू, कोणतीही नाराजी नाही असं दादा भुसेंनी म्हटलंय.