वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आलाय.खासगी चालकाच्या मुलांना ठेकेदारामार्फत पवार यांनी नोकरीला लावल्याचं समोर आलंय.चालकाच्या 4 मुलांना महापालिकेत नोकरी दिल्याचे उघडकीस आलंय. पवार यांचे खासगी वाहनचालक मधुकर राऊत यांची चारही मुले महापालिकेत कामाला आहेत.RTI कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या दस्तऐवजांमधून याला पुष्टी मिळाली.मधुकर राऊत यांचा पगार मनपाकडून पवार यांना मिळणाऱ्या वाहन भत्त्यातून व्हायचा. राऊत यांची चारही मुले पालिकेत विविध पदांवर आहेत.मुलगा जितेन राऊत चालक, मुलगी मानसी राऊत टंकलेखक, अपर्णा वैती आणि सृष्टी दोघी शिपाई आहेत.एकाच कुटुंबातील 5 जणांना पालिकेत नोकरी असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय..