खरंच लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय? पाडणाऱ्या नेत्यांना Babasaheb Patil यांनी आरसा दाखवला? NDTV

राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे पुरता खचलाय. पीक उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलाय. यातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी सरकारकडे मोठ्या आशेने पाहतोय. सरकारने मदत जाहीर केली. मात्र ती मदत शेतकऱ्यांना अपुरी वाटतेय. अशा परिस्थित सरकारमधले मंत्रीदेखील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना दिसतायत. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागल्याचं वक्तव्य केलंय.. यामुळे राजकीय वाद उफाळून आलाय.. पण बाबासाहेब पाटलांच्या याच वक्तव्यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांच्याही डोळ्यात अंजन घातलंय.. निवडणुकीपुरतं आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या नेत्यांना बाबासाहेब पाटील यांनी आरसा दाखवलाय.. पण त्यांच्या इशारा नेमका कुणाकडे आहे.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ