बीडमध्ये शेतकऱ्यांना पवनचक्की कंपनीचं काम थांबवलं म्हणून पोलिसांनीच धमकाावलंय.O2 रिन्व्यूअबल या पवनचक्की कपंनीचे वीज पुरवठा करणारे टॉवर आणि तार शेतकरी गणेश झोडगे आणि कृष्णा कुडके यांच्या शेतातून जात आहेत,पण पवनचक्की कंपनीने मावेजा न दिल्याने काम करू नका असं या शेतकऱ्यांनी म्हटलं.आणि यावरूनच दोन दिवसांपूर्वी दुपारी काम थांबवल्याने दत्ता बळवंत, सचिन मुरूमकर आणि सचिन गर्जे यांनी शेतकऱ्याला धमकवल्याचा आरोप होतोय.पोलिसांनी शेतकऱ्याला ‘सातबारा’ दाखवण्याची मागणी केली. पोलिसाने ‘UPSC ची मेन्स दिलीय, नीट बोला’ असे बोलून शेतकऱ्याला धमकावले आणि ‘कॅरॅक्टर खराब करून टाकीन’ अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. यावर शेतकऱ्याने ही जमीन स्वतःची असून ती एक एकर असल्याचे सांगितले. ‘आम्ही टॉवरपाशी काम करायला कुठं करणार आहोत?’ असा प्रश्नही त्याने पोलिसांना विचारला. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रीत करत असताना, पोलिसांनी जास्त शांतपणाने व्हिडिओ न काढण्याची सूचना दिली. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.