15 ऑगस्टला नॉनव्हेज खायचं की नाही, यावरुन आता सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलीय. स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या महापालिकांच्या फतव्यांविरोधात आज ठाकरे गट तर चांगलाच आक्रमक झाला.हा फतवा नेमका कुणाच्या डोक्यातून निघाला यावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.सरकार महाराष्ट्राला नपुंसक बनवतंय, असा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केला.त्याचवेळी राऊतांनी महाराष्ट्र, शिवाजी महाराज, मावळे, पेशवे, शिंदे हे सगळे काय खात होते, त्याचा इतिहाससुद्धा सांगितला.