राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे.मराठी माणसाचा जेव्हा विषय येतो, तेव्हा या दोन नेत्यांची नावं प्रामुख्यानं घेतली जातात.काही दिवसांपूर्वी हे ठाकरे भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले.मात्र आज ज्यावेळी मराठी माणसावर अन्याय होत होता, त्यावेळी ठाकरे बंधू आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते मूग गिळून गप्प का बसले. हे सगळं विचारण्याचं कारण म्हणजे आज दादरमध्ये मराठी माणसानं कबूतरखान्यांविरोधात आंदोलन केलं.काही दिवसांपूर्वी जेव्हा जैनांनी या कबूतरांचा कळवळा दाखवत आंदोलन केलं, त्यावेळी पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत होते.आज मराठी माणसाच्या आंदोलनावेळी मात्र पोलिसांनी मराठी माणसांना खेचलं, ओढत नेलं आणि वाट्टेल तसं पोलिसांच्या गाडीत कोंबलं. मराठी माणसाला इतकी अपमानास्पद वागणूक आणि तीही पोलिसांकडून मिळत असताना मराठी माणसाचे नेते म्हणणारे हे नेते कुठे होते, हा आमचा सवाल आहे.