सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरु झाल्याची घणाघाती टीका मंत्री भरत गोगावलेंनी केली.आमच्या मेहनतीमुळेच सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार झाले.ते आता विसरले असतील पण आता त्यांची उलटी गिनती सुरू झालीये.. अशा शब्दात भरत गोगावलेंनी हल्लाबोल केलाय.माणगाव इथं आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना भाजपच्या 4 आमदारांनी जर मदत केली नसती, आम्ही थोडी जरी मान वाकडी केली असती तरी त्यांचा जय महाराष्ट्र झाला असता असंही भरत गोगावले म्हणाले.