15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच आगामी हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर पाच महापालिका हद्दीतील कत्तलखाने, मांस आणि मटण विक्रीची दुकानें बंद ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी काढलेत. पण या निर्णयाला आता विरोध होतोय. अगोदर जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेंनी याविरोधात सूर लावला होता. पण आता सर्वसामान्य़ांमधूनही निषेधाचा सूर उमटतोय..अशा निर्णयांमुळे आपल्या मुलभूत स्वातंत्र्याचा संकोच होतोय, असं या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचं मत आहे. तर कुणी काय खायचं हे आयुक्त ठरवणार का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश काढलेत.15 ऑगस्टला महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश आता देण्यात आलेत. नाशिक महापालिकेच्या पशुवैदकीय विभागाने हे आदेश दिलेत.कुणीही जनावरांची कत्तल करू नये, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.