मुंबई हायकोर्टाने कबुतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम ठेवल्याची माहिती समोर येतीय.'सकाळी 6 ते 8 दरम्यान कबुतरांना खाद्य घालण्याचं विचाराधीन असल्याचं पालिकेने कोर्टात सांगितलं. त्यानंतर पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही, असं म्हटलंय. त्याचबरोबर फक्त कबुतरांच्या खाद्याचा विचार करू नका तर सार्वजनिक आरोग्याचाही विचार करा, असे निर्देश हायकोर्टाने दिलेत.