Ayudh nirmani कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द- सूत्रांची माहिती | NDTV मराठी

देशभरातील आयुध निर्माण कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.चंद्रपूरच्या भद्रावती आयुध निर्माणमधील सुत्रांकडून ही माहिती समोर आली.तणावाची स्थिती आणि संबंधित घडामोडी बघता भारताच्या संरक्षण मंत्रालयाने देशातील आयुध निर्माणीलाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. चालू आठवड्यापासून या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून अनिश्चित काळासाठी असल्याची माहिती भद्रावती आयुध निर्माणीतील अधिकारी सूत्राने दिली.

संबंधित व्हिडीओ