Beedच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त, माजलगाव न्यायालयाकडून जप्तीचे आदेश | NDTV मराठी

बीडच्या माजलगाव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडी जप्तीचे आदेश दिलेत. या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कार्यालयातून जप्त करण्यात आली आहे.वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे लघु सिंचन तलावासाठी तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या जमिनी संपादित केल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात आलेला मावेजा तुटपुंजा होता. त्यामुळे वाढीव मावेजा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी माजलगाव न्यायालयात धाव घेतली होती. 2015 साली व्याजासहित शेतकऱ्यांना ही रक्कम द्यायची होती. त्यामध्ये जवळपास 29 लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. मात्र याची पूर्तता न झाल्यानं गाडी माजलगाव न्यायालयाने जप्त केली आहे.

संबंधित व्हिडीओ