बीड जिल्हा सत्र न्यायालयानं रणजीत कासलेला जामीन मंजूर केला आहे. एट्रॉसिटी एक्ट प्रकरणामध्ये रणजित कासलेवर पहिला गुन्हा बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. रणजीत कासलेला राज्यभर गाजलेल्या प्रकरणामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत असल्यानं पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाला धारेवर धरल्याच्या कारणाने आणि राजकीय हेतू साधण्यासाठी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीएसआय रणजीत कासलेच्या विरोधामध्ये जो एट्रॉसिटी चा गुन्हा होता कलम तीन एक आर प्रमाणे. त्या गुन्ह्यामध्ये आज मान्य न्यायालयाने रणजित कासले यांना जामीन मंजूर केलेला आहे.