गेल्या सात दिवसांपासून नाशिकमध्ये अवकाळी पावसानं थैमान खातलंय. आणि याचा मोठा परिणाम कांदा पिकांवर झालेला आहे. आधीच कांद्याला मातीमोल भाव मिळतोय आणि त्यातच ऐन काढणीच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं कांदा शेतातच खराब होतोय.