बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले तरी संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही.त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.आज मस्साजोगच्या ग्रामस्थांची बैठक पार पाडली.बैठकीत ग्रामस्थांनी फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय अन्यथा रास्तारोको आंदोलन करु असा अल्टिमेटम दिलाय. तर आवादा कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही करण्यात आलीय.