छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नशेच्या औषधी घेऊन त्याची विक्री करणाऱ्या रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केलंय.. उत्तर प्रदेशच्या कानपूरहून औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर देऊन छत्रपती संभाजीनगरमार्गे नाशिक, मालेगावमध्ये नशेसाठी तस्करी होत होती.. या रॅकेटचा अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने वाळूजमध्ये रात्री पर्दाफाश केला.. यात एकूण 41 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. 12 आरोपींना अटक करण्यात आलंय.. तर 2 हजार 504 नशेच्या औषधींसह 12 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय.. यात मुख्य आरोपी अविनाश पाटील याच्यासह एकूण 11 आरोपी आहेत. तसेच 18 सप्टेंबर पर्यंत या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावलीय...