मतचोरी संदर्भातील काँग्रेसच्या आरोपांना आता नक्षलवाद्यांनी देखील पाठिंबा दिला. नक्षल्यांच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या "सेंट्रल कमिटी"ने एक पत्रक काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर मतचोरीकरून सत्ता मिळवण्याचा गंभीर आरोप केलाय.मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून मतचोरी होत असल्याचा आरोप केलाय.. त्याचबरोबर त्याकाळात मोदी हे मतचोरीनेच विधानसभेसोबत इतर निवडणुका जिंकल्याचा आरोपही त्यांनी केलाय..