हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आल्याचं चित्र आहे.यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जातीय, असं वाटतंय.. सामाजिक वीण जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, मात्र सामाजिक ऐक्य जपायला हवं, असं शरद पवारांनी म्हटलंय.. पवारांनी एक प्रकारे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय..