Global Report | रशियाचा पोलंडवर ड्रोन हल्ला, नाटो-रशिया युद्ध सुरु होणार? तिसरं महायुद्ध पेटणार का?

१५ ऑगस्टला ट्रम्प पुतीन यांची अलास्कामध्ये बैठक झाली आणि एक आशा निर्माण झाली ती तीन वर्ष सुरु असलेलं रशिया-युक्रेन युद्ध थांबेल याची... मात्र ती आशा एक आभास ठरली की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण त्यानंतर केवळ नाटो-झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या बैठकीव्यतिरिक्त इतर कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. ट्रम्प यांनी रशियावर दबाव आणण्यासाठी त्याच्या मित्र राष्ट्रांवर टॅरिफ लावला मात्र कुऱ्हाड अमेरिकेच्याच पायावर पडलीय.. हे कमी की काय तर अलिकडेच रशियानं धाडलेली ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीवर जाऊन धडकली आणि आणखी एक ठिणगी उडाली... रशियानं नाटो सदस्यावर हल्ला केला... आता नाटो सदस्य काय करणार... नाटो सदस्य राष्ट्रांनी या कृतीचा निषेध तर केलाय. मात्र आता खरंच नाटो देश रशियाविरुद्ध युद्धात प्रत्यक्ष उतरणार का.... आणि तसं झालंच तर अमेरिकाही त्याच्या शब्दाला जागून युद्धात उतरणार का... आणि असं झालं तर खरंच तिसरं महायुद्ध पेटणार का.... पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ