पुण्यातील हडपसर कामधेनू स्टेटस मधील एका नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब आढळला.. बॉम्बशोधक पथक घटनास्थळावर दाखल झालं होतं.. त्यानंतर बॉम्ब घेऊन पथक मोकळ्या जागेत रवाना झालंय.. या बॉम्बसह जिलेटीनच्या कांड्या देखील होत्या.. त्यात सात तासांचं टायमर सेट करण्यात आलं होतं... बीडीडीएस पथक, अग्निशमन दलासह घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते.. त्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं..