Maharashtra Unseasonal Rain| महाराष्ट्रात काय आहे अवकाळी पावसाची स्थिती? जाणून घ्या

साताऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली.. दुपारी अचानकच सातारा शहरासह भागात ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याचे चित्र पाहायला मिळालं.. जिल्हा शासकीय रूग्णालय परिसरातही झाडे उन्मळून पडली तर कोंडवे परिसरात 22 शेळ्या मेंढ्यावर विज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.तर सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वायफळे येथे गारांचा पाऊस झाला.. दिवसभर उन्हाचा कडाका आणि सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं.पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झालीय.. या गारपीट आणि पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेलेत.तर पालखी महामार्गावरील अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर झाड कोसळून काही काळ रस्ता देखील बंद झाला होता. तसेचबीडच्या पाटोदा शहर आणि परिसराला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले... वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडाले आहेत याबरोबरच अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली...

संबंधित व्हिडीओ